महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिग्गज फुटबॉलर दिएगो फोरलानने घेतली निवृत्ती

२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत दिएगोने गोल्डन बुट जिंकला होता.

दिग्गज फुटबॉलर दिएगो फोरलानने घेतली निवृत्ती

By

Published : Aug 7, 2019, 8:57 PM IST

नवी दिल्ली -उरुग्वेचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो फोरलानने मंगळवारी आपली निवृत्ती जाहीर केली. दिएगोने याआधी इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनाइटेड आणि एटलेटिको मॅड्रिडचे प्रतिनिधीत्व केले आहे.

२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत दिएगोने गोल्डन बुट जिंकला होता. ४० वर्षीय दिएगो फोरलानने इंटर मिलान संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. एटलेटिको मॅड्रिड संघातून त्याने विशेष कामगिरी केली होती.

निवृत्तीच्या वेळी दिएगो म्हणाला, 'ही गोष्ट माझ्यासाठी सोपी नव्हती. ही वेळ यावी असे मला कधीच वाटत नव्हते. पण निवृत्तीची वेळ येणार हे मला माहित होते. मी व्यावसायिक स्तरावरील फुटबॉलमधून निवृत्ती घेत आहे.'

२००२ मध्ये दिएगो मँचेस्टर युनाइटेड संघात गेला. त्यानंतर, या संघातून खेळताना त्याने इंग्लिश प्रीमियर लीगचा (ईपीएल) किताब पटकावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details