नवी दिल्ली -किडनीच्या समस्येने ग्रस्त असलेला भारताचा युवा फुटबॉलपटू रामानंद निंगथौजमला क्रीडा मंत्रालय ५ लाखांची मदत देणार आहे. मणिपूरचा रहिवासी असलेल्या रामानंदने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रिक्षाचालकाचा मुलगा असलेला रामानंद सध्या मणिपूरच्या शिजा हॉस्पिटलमध्ये आहे.
रामानंद मूत्रपिंड व्यतिरिक्त डोळ्यांच्या समस्येनेही ग्रस्त आहे. त्यांचे कुटुंबीय उपचार घेण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी रामानंदला मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून रामानंदला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी फक्त खेळाडूंसाठी जमवण्यात येतो.