मुंबई- चीनमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. जगभरातील बहुतांश स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पण, आता अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यात त्यांनी, क्लबमधील ३५ टक्के खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं म्हटलं आहे.
कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आम्ही उर्वरित कर्मचारी आणि खेळाडूंना घरीच थांबण्याचे आदेश दिले असल्याचेही क्लबने निवेदनात स्पष्ट केलं आहे.