नवी दिल्ली -कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादलेला कर्फ्यू मोडल्याबद्दल सर्बियन फुटबॉलर अलेक्झांडर प्रीजोविक याला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 29 वर्षीय अलेक्झांडरला या काळात नजरकैदेत ठेवले जाईल. सौदी अरेबियन क्लब-एतिहादकडून खेळणार्या प्रोजोविकला व्हिडिओ लिंक ट्रायल दरम्यान झालेल्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले.
कर्फ्यू मोडलेल्या 'त्या' फुटबॉलपटूला मिळाली मोठी शिक्षा - footballer aleksander prijovic sentenced news
बेलग्रेडमधील हॉटेल लॉबी बारमध्ये कर्फ्यू दरम्यान जमलेल्या जमावाच्या आरोपावरून पोलिसांनी प्रोझोविक आणि इतर 19 जणांना अटक केली. प्रोझोव्हिकच्या अगोदर, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिअल माद्रिदचा स्ट्रायकर लुका जोविक यालाही अटक करण्यात आली होती.

दरम्यान, केनियाचा माजी विश्वविजेता धावपटू आणि सध्या पोलीस विभागात कार्यरत असलेला विल्सन किप्सांगने लॉकडाउन दरम्यान कर्फ्युचे उल्लंघन केले. रात्रीच्या वेळी कर्फ्यू दरम्यान मद्यसेवन केल्यामुळे आणि लोकांना घेऊन पूल खेळल्यामुळे त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. शुक्रवारी त्याला न्यायालयाकडून दोषी ठरवून जामिनावर सोडण्यात आले.