ब्राझील - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साओ पाउलो येथील पाकाएम्बू स्टेडियमला 'ओपन एअर हॉस्पिटल' बनवण्यात आले आहे. ४५००० क्षमतेच्या या स्टेडियममध्ये २०० पेक्षा जास्त बेड्स बसू शकतात. हे हॉस्पिटल १० दिवसात पूर्णपणे तयार होईल. या स्टेडियमच्या आसपास अनेक मोठी रुग्णालये आहेत.
हेही वाचा -कोलकाता 'लॉकडाऊन' पाहून दादा झाला भावूक
सोमवारी दुपारपर्यंत, ब्राझीलमध्ये कोरोनाचे १६०० रुग्ण सापडले असून त्यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१४ च्या वर्ल्डकप दरम्यानची सर्व मैदाने खुल्या हॉस्पिटल्समध्ये रूपांतर करण्याची ऑफर देण्यात आली आहे.
ब्राझीलमधील आघाडीच्या फुटबॉल संघांनी (क्लब्स) कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढ्यात मदत करण्यासाठी आपली मैदाने आरोग्य विभागाला देण्याची ऑफर दिली आहे. यावर फील्ड हॉस्पिटल आणि छोटी रुग्णालये बांधली जाऊ शकतात. पुढील सूचनेपर्यंत देशातील फुटबॉल स्पर्धा तहकूब करण्यात आल्या आहेत.