काठमांडू (नेपाळ) - भारतीय युवा फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव करत सॅफ करंडक जिंकला. काठमांडूच्या हलचौक स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा २-१ ने पराभव केला. दरम्यान, पहिल्यांदाच १८ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघाने सॅफ अंडर चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली आहे.
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफच्या दुसऱ्या मिनिटालाच भारताच्या विक्रम प्रताप सिंह याने गोल करत संघाला १-० अशी बढत मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रत्त्युत्तरात जोरदार आक्रमण करत १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल यासिनने बांगलादेशासाठी केला. असा प्रकारे पहिला हाफ १-१ ने बरोबरीत सुटला.