महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फुटबॉल : सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात, नेपाळचा ४-१ ने केला पराभव

सामन्याच्या सातव्या मिनिटाला सुमती कुमारीने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लिंडाने ३८ व्या आणि ५६ व्या मिनिटाला गोल करत स्कोर ३-० केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल मन माया दमाईने ६२ व्या मिनिटाला गोल करत नेपाल संघाचे खाते उघडले. ६६ व्या मिनिटाला प्रियंकाने चौथा गोल केला.

फुटबॉल : सॅफ अजिक्यपद स्पर्धेत भारताची विजयी सुरूवात, नेपालचा ४-१ ने केला पराभव

By

Published : Oct 9, 2019, 11:13 PM IST

नवी दिल्ली - सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय अंडर-१५ महिला फुटबॉल संघाने नेपालचा पराभव करत विजयी सुरूवात केली आहे. भूतानच्या चालिमिथांग मैदानावर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने नेपालचा ४-१ ने पराभव केला. भारतीय स्ट्रायकर लिंडा कोम सेर्तो हिने २ केले तर सुमती कुमारी आणि प्रियंका सुझीश यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

सामन्याच्या सातव्या मिनिटाला सुमती कुमारीने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लिंडाने ३८ व्या आणि ५६ व्या मिनिटाला गोल करत स्कोर ३-० केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल मन माया दमाईने ६२ व्या मिनिटाला गोल करत नेपाल संघाचे खाते उघडले. ६६ व्या मिनिटाला प्रियंकाने चौथा गोल केला.

विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक एलेक्स एंब्रोस यांनी सांगितले की, 'स्पर्धेतील पहिला सामना जिंकणे नेहमीच अवघड असते. पण, आम्ही पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरलो. सामन्यात खेळाडूंनी लहान-लहान पास देत संधी पाहून गोल केले. पुढील सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे.' दरम्यान, या स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना शुक्रवारी यजमान भूतानशी होणार आहे.

हेही वाचा -भारतीय फुटबॉल संघाने रचला इतिहास, बांगलादेशचा पराभव करत जिंकला 'U-१८ सॅफ करंडक'

हेही वाचा -सैफ चॅम्पियनशिप : मालदीवला पाणी पाजत भारत फायनलमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details