महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बंदी असूनही रशिया खेळू शकतो फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा पात्रता सामना - रशिया खेळणार पात्रता सामना न्यूज

डोपिंगबाबत चुकीचा तपशील पुरवल्याने रशियावर ही बंदी घालण्यात आली आहे. याबाबत वाडाच्या प्रवक्त्याने तपशीलवार माहिती दिली आहे. वाडाच्या कार्यकारी समितीची बैठक स्वित्झर्लंड मध्ये पार पडली. एका लॅबमधून डोपिंगबाबत योग्य अहवाल न दिल्याने ४ वर्षांच्या बंदीचा कठोर निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे 'वाडा'ने सांगितले.

Russia to play FIFA World Cup qualifying match despite ban
बंदी असूनही रशिया खेळू शकतो फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा पात्रता सामना

By

Published : Dec 10, 2019, 11:23 AM IST

नवी दिल्ली -आगामी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी रशियाला मोठा धक्का बसला. जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे रशिया हा देश आता पुढील चार वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून बाद झाला आहे. मात्र, बंदी असूनही रशिया फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा पात्रता सामना खेळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा

'पात्रता सामन्यातून विजेता ठरणार नाही. त्यामुळे रशिया त्यात सहभागी होऊ शकेल. बंदीचा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरासाठी आहे', असे वाडाच्या अनुपालन आढावा समितीचे अध्यक्ष जोनाथन टेलर यांनी सांगितले आहे. 'फिफा यासाठी नवीन प्रस्ताव आणू शकते. फिफाने यापूर्वी असे म्हटले होते की ते रशियावरील बंदीच्या परिणामाचा आढावा घेईल. रशियाने २०१८ मध्ये विश्वचषक आयोजित केला होता', असेही टेलर यांनी म्हटले आहे.

जोनाथन टेलर

डोपिंगबाबत चुकीचा तपशील पुरवल्याने रशियावर ही बंदी घालण्यात आली आहे. याबाबत वाडाच्या प्रवक्त्याने तपशीलवार माहिती दिली आहे. वाडाच्या कार्यकारी समितीची बैठक स्वित्झर्लंड मध्ये पार पडली. एका लॅबमधून डोपिंगबाबत योग्य अहवाल न दिल्याने ४ वर्षांच्या बंदीचा कठोर निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे 'वाडा'ने सांगितले.

रशिया वाडाच्या या निर्णयाला पुढील २१ दिवसात आव्हान देऊ शकतो. असे सांगण्यात आले. जर रशियाने आव्हान दिल्यास या प्रकरणी स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होऊ शकते. दरम्यान, वाडाचा रशियावरिल कारवाईचा निर्णय क्रीडाविश्वातील सर्वात कठोर निर्णय मानला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details