महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोला इटलीला बोलावले - christiano ronaldo itay call latest news

सिरी 'ए' चे सर्व 20 संघ अधिकृतपणे स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. गतविजेत्या जुव्हेंटसने रोनाल्डोसह आपल्या परदेशी खेळाडूंना सरावासाठी इटलीला आमंत्रित केले आहे. माडेयरा बेटावरून परत आल्यानंतर रोनाल्डोसह इतर खेळाडूंनाही दोन आठवडे एकांतात घालवावे लागणार आहेत.

ronaldo was asked to come back italy for practice
दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोला इटलीला बोलावले

By

Published : May 5, 2020, 8:58 AM IST

नवी दिल्ली -इटलीतील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिरी 'ए' लीगमधील फुटबॉल क्लब जुव्हेंटसने दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला पोर्तुगालमधून बोलावले आहे. इटलीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे आणि सद्य परिस्थिती पाहता घरगुती स्पर्धा सुरू होण्याबद्दल शंका कायम आहे.

देशाच्या गृहमंत्र्यांनी खेळाडूंना क्लब प्रशिक्षण सुविधांचा वापर करण्यास परवानगी दिली. त्यानंतर चाहत्यांकडून हंगाम सुरू होण्याची अपेक्षा वाढली आहे. वैयक्तिक सराव सुरू करता येईल, परंतु गटात सराव करण्याचा निर्णय 18 मे रोजी घेण्यात येईल, असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले आहे.

सिरी 'ए' चे सर्व 20 संघ अधिकृतपणे स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. गतविजेत्या जुव्हेंटसने रोनाल्डोसह आपल्या परदेशी खेळाडूंना सरावासाठी इटलीला आमंत्रित केले आहे. माडेयरा बेटावरून परत आल्यानंतर रोनाल्डोसह इतर खेळाडूंनाही दोन आठवडे एकांतात घालवावे लागणार आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details