मुंबई - भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला स्पेनच्या 'ला लीग फुटबॉल स्पर्धे'चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. गुरुवारी मुंबईत 'ला लीगा'च्या वतीने ही घोषणा करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या स्पर्धेच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळाडूची ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे.
या विषयी बोलताना रोहितने सांगितले की, 'ला लीगाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड होणे माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. भारत सध्या इतर खेळांमध्ये तसेच फुटबॉलमध्ये प्रगती करत आहे. कारण आयएसएल आणि राष्ट्रीय संघाचे सामने बघताना ही गोष्ट दिसून येते. आयएसएलमुळे युवा खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे.'