नवी दिल्ली - जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकचा खेळाडू रॉबर्ट लेवांडोव्स्कीला युईएफएचा २०१९-२०या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. "ही एक चांगली भावना आहे. मला संघातील सहकाऱ्यांचे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने मी खेळलो त्यांचे आभार मानायचे आहेत. तसेच, मी माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो", असे लेवांडोव्स्कीने या निवडीनंतर सांगितले.
लेवांडोव्स्कीने या मोसमात ४७ सामन्यांत ५५ गोल केले आहेत. या हंगामात त्याने केवळ पाच सामने खेळले. जर्मन लीगमध्ये ३४ गोलांसह तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १५ आणि डीएफबी चषकात ६ गोल केले. लेवांडोव्स्कीने १० गोल करण्यात ही सहकार्य केले आहे.