पॅरिस - स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडल्यानंतर फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मन क्लबसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. लवकरच तो दुसऱ्या क्लबकडून खेळताना पाहायला मिळेल. लिओनेल मेस्सीने 21 वर्षांनंतर स्पॅनिश क्लब बार्सिलोनाची साथ सोडली होती. तो प्रेस कॉन्फरन्समध्ये भावूक झाला होता.
लिओनेल मेस्सीला पॅरिस सेंट जर्मन क्लबकडून खेळताना दरवर्षी 25 मिलियन पाउंड म्हणजे जवळपास 258 कोटी रुपये मिळतील. 34 वर्षीय मेस्सीला 3 वर्षे हा करार वाढवता येऊ शकतो. मेस्सी बार्सिलोनासोबत 5 वर्षांच्या करारासाठी तयार होता. परंतु क्लबने हा करार नाकारला.
मागील आठवड्यात बार्सिलोना क्लब सोडल्यानंतर मेस्सीकडे दोन पर्याय होते. त्याने पीएसजीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मेस्सीने मागे म्हटलं होतं की, मी बार्सिलोनासोबत राहु इच्छित आहे. यासाठी मी सर्व प्रयत्न केले. यात मी माझं मानधन 50 टक्क्याने कमी करण्यास तयार झालो होतो.