माद्रिद - स्पेनचा फुटबॉल क्लब रियल माद्रिदचा खेळाडू मारियानो डायझ कोरोना पॉझिटिव्ह आ़ढळला आहे. क्लबने ही माहिती दिली. कोरोना चाचणीनंतर 26 वर्षीय डायझने स्वत:ला घरात क्वारंटाईन केले. नुकतेच रियल माद्रिदने ला-लीगाचे 34 वे विजेतेपद जिंकले आहे.
क्लबने सांगितले, ''सोमवारी आमच्या पहिल्या संघातील फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी मारियानो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यांची तब्येत तंदुरुस्त आहे आणि तो घरी क्वारंटाईन आहे."
7 ऑगस्ट रोजी एतिहाद स्टेडियमवर मँचेस्टर सिटीशी झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग सामन्यापूर्वी डायझ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. मार्चमध्ये झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या राऊंड 16 मध्ये रिअल माद्रिदच्या संघाला सिटीकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता.
डायझच्या अनुपस्थितीत लुका जोविचला खेळण्याची संधी मिळू शकते. माद्रिदने विला रियालला 2-1 ने हरवत ला-लीगाचे विजेतेपद पटकावले. माद्रिदचे हे सलग तिसरे आणि एकूण 34 वे ला-लीगा जेतेपद आहे. प्रशिक्षक झिदानच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे.