महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदी झिनेदिन झिदानची वापसी - ख्रिस्तियानो रोनाल्डो

सॅन्टियागो सोलारी यांच्या प्रशिक्षणाखाली संघाच्या खालावलेल्या कामगिरीमुळे रिअल माद्रिदच्या व्यवस्थापनाने झिनेदिन झिदान यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

झिदाने ११

By

Published : Mar 12, 2019, 11:44 AM IST

माद्रिद- रिअल माद्रिदचे माजी प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांची अवघ्या १० महिन्यानंतर पुन्हा प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. सॅन्टियागो सोलारी यांच्या प्रशिक्षणाखाली संघाच्या खालावलेल्या कामगिरीमुळे रिअल माद्रिदच्या व्यवस्थापनाने झिनेदिन झिदान यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

रिअल माद्रिद संघाला विक्रमी सलग ३ वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आश्चर्यकारकरित्या हंगामाच्या सुरुवातीला झिनेदिन झिदानने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी स्पेनचे प्रशिक्षक ज्युलियन लोपेटगुई यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात रिअलची इतिहासात सर्वात खराब कामगिरी झाली होती. अवघ्या ४ महिन्यांच्या कार्यकाळातच लोपेटगुई यांना रिअलने प्रशिक्षकपदावरुन हटवले होते. त्यानंतर त्यांच्या जागी सॅन्टियागो सोलारी यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, त्यांच्या कार्यकाळातही संघाला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले होते.

झिनेदिन झिदान यांनी अडीच वर्षे संघाचे प्रशिक्षकपद सांभाळताना ९ स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले होते. चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद सलग ३ वेळा मिळवून देणारे जगातील ते एकमेव प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कार्यकाळात रिअल माद्रिद जगातील अव्वल संघ होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिअल माद्रिदला यावर्षी एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. संघ कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग आणि ला लीगाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details