महाराष्ट्र

maharashtra

UEFA CHAMPIONS LEAGUE: गतविजेता रिअल माद्रिदचा दारुण पराभव

By

Published : Mar 7, 2019, 3:06 PM IST

विक्रमी १३ वेळचा विजेता आणि सलग ३ वेळा स्पर्धा जिंकणारा एकमेव क्लब रिअल माद्रिद चॅम्पियन्स लीग स्पर्धेबाहेर झाला आहे. कोपा डेल रे आणि ला लीगामध्ये संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धा बार्सिलोनाविरुद्ध पराभव झाला होता.

रिअल माद्रिद ११

माद्रिद- विक्रमी १३ वेळचा विजेता आणि सलग ३ वेळा स्पर्धा जिंकणारा एकमेव क्लब रिअल माद्रिद चॅम्पियन्स लीग स्पर्धेबाहेर झाला आहे. परतीच्या लढतीत एजाक्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रिअल माद्रिदचा ४-१ अशा फरकाने दारुण पराभव झाला. २०१५ नंतर रिअलचा पहिल्यांदाच उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला आहे.

पहिल्या फेरीच्या लढतीत रिअलने २-१ असा विजय मिळवला होता. परंतु, परतीच्या लढतीत घरच्या मैदानावर खेळणाऱया रिअलला याचा फायदा घेता आला नाही. एजाक्स संघाने पहिल्या २० मिनिटात २ गोल केले. ७व्या मिनिटाला एच. झियेक आणि १८ मिनिटाला डेव्हिड नेरेसने गोल करत एजाक्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात रिअलला गोल करण्यात अपयश आले.

दुसऱ्या सत्रात रिअलने गोल करण्यासाठी आक्रमक खेळ केला. परंतु, रिअलला गोल करण्यात अपयश आले. एजाक्सकडून ६२ मिनिटाला डुसान टॅडिकने गोल करत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. रिअलकडून ७० व्या मिनिटाला मार्को असेन्सियोने एकमेव गोल केला. एजाक्सकडून लगेचच ७२ व्या मिनिटाला एल. शोनने चौथा गोल करत रिअलचा पराभव निश्चित केला.

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिअलला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. संघाला यावर्षी एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. मागील ५ सामन्यात रिअलला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २००४ नंतर संघाला प्रथमच रिअलला सलग ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोपा डेल रे आणि ला लीगामध्ये संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धा बार्सिलोनाविरुद्ध पराभव झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details