नवी दिल्ली -जम्मू - काश्मीर पूर्णपणे बंद असल्या कारणाने रिअल काश्मीर फूटबॉल क्लबचे खेळाडू संकटात सापडले आहेत. या बंदीमुळे खेळाडूंना आपल्या नातेवाईकांना संपर्क साधण्यात अपयश येत आहे.
कलम ३७० च्या निर्णयामुळे रिअल काश्मीरचे खेळाडू संकटात
दंड प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू केल्याने टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद झाल्या आहेत.
असे असले तरी, आगामी डुरांड कप स्पर्धेकडे रिअल काश्मीरच्या खेळाडूंचे लक्ष लागले आहे. त्यांचा सामना चेन्नई सिटीच्या विरोधात होणार आहे. त्यापूर्वी, या खेळाडूंनी कडेकोट बंदोबस्तात सराव केला. केंद्र सरकारने सोमवारी जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले. त्यामुळे, दंड प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू केल्याने टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपल्या नातेवाईकांना संपर्क साधण्यात अपयश येत आहे.
या संघाचा स्टार खेळाडू दानिश फारुखने सराव करताना सांगितले, 'मी घरातून बाहेर पडल्यापासून त्यांच्या संपर्कात नाही. मला त्यांची खूप काळजी वाटते आहे. पण, या गोष्टीचा आमच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. आम्ही फक्त सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत.'