नवी दिल्ली - कोटिफ कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने बोलिव्हियाला ३-१ ने पराभूत केले. स्पेनमध्ये रंगलेल्या सामन्यात रतनबाला देवीने २ आणि बाला देवी हिने १ गोल केले.
कोटिफ कप : भारतीय महिला संघाने एक गोलच्या पिछाडीनंतरही बोलिव्हियाला ३-१ ने हरवले - Bolivia
स्पेनमध्ये रंगलेल्या सामन्यात रतनबाला देवीने २ आणि बाला देवी हिने १ गोल केले.
दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात स्पेनचा क्लब विल्लीरीयल सीएफने भारताचा ०-२ ने पराभव केला होता. बोलिव्हियाच्या विरुध्द खेळतानाही भारतीय संघ पहिल्या दोन मिनिटात मागे पडला. मात्र, बोलिव्हियाची ही लीड काही वेळापूरतीच राहिली.
सामन्याच्या पाचव्या मिनिटाला बाला देवी हिने विरोधी संघाच्या पेनल्टी क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवत पहिला गोल केला. तेव्हा दोन्ही संघ १-१ च्या बरोबरीत आले. त्यानंतर ३६ व्या मिनिटाला डाव्या साईडने मिळालेल्या क्रॉसवर रतनबाला देवी हिने हेडरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. या गोलच्या काही वेळातच रतनबाला हिने व्यक्तीगत दुसरा गोल करत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताने ही आघाडी शेवटपर्यंत राखली आणि विजय मिळवला.