लुधियाना - संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपात्यं फेरीत पंजाबने गोव्याला 2-1 ने पराभूत केले. या विजयासह पंजाबच्या संघाने पंधराव्यांदा संतोष ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
गोव्याला पराभूत करुन पंजाब संतोष ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल - Santosh Trophy final
दुसारी उपात्यं फेरी सर्व्हिसेस फुटबॉल संघ आणि कर्नाटक यांच्यात खेळली जाणार आहे
पंजाब संघ
गुरुनानक मैदानावर खेळण्यात आलेल्या या सामन्यात पंजाबकडून 12 व्या मिनीटाला जसप्रीतने गोल करत आघाडी मिळवून दिली. 89 व्या मिनीटाला गोव्याला 1 गोल करण्यात यश आला, मात्र अखेरच्या क्षणी हरजिंदर सिंह गोल दागत पंजांबला विजय मिळवून दिला.
संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेची दुसारी उपात्यं फेरी सर्व्हिसेस फुटबॉल संघ आणि कर्नाटक यांच्यात खेळली जाणार आहे. यामधील विजेता संघ आणि पंजाब यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.