लिस्बन -पोर्तुगाल फुटबॉल क्लब व्हिटोरिया गुईमारेसमधील तीन खेळाडू कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, क्लबने म्हटले, "खेळाडूंना लक्षणे नव्हती. त्यांना क्वारंटाईन करण्याl आले आहे."
पोर्तुगाल फुटबॉल क्लबच्या 3 खेळाडूंना कोरोनाची लागण - players corona positive in vitoria fc news
क्लबचे कर्मचारी, प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या तपासणीनंतर शुक्रवारी या गोष्टीची खातरजमा झाली. आरोग्य नियमांच्या मंजुरीनंतर देशातील प्रथम विभाग फुटबॉल लीग प्रेक्षकांशिवाय मेच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करू करता येऊ शकेल, असे पोर्तुगाल सरकारने 30 एप्रिल रोजी सांगितले होते.
![पोर्तुगाल फुटबॉल क्लबच्या 3 खेळाडूंना कोरोनाची लागण Portugal football club vitorias 3 players tetsted corona positive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7146794-76-7146794-1589166905694.jpg)
क्लबचे कर्मचारी, प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या तपासणीनंतर शुक्रवारी या गोष्टीची खातरजमा झाली. आरोग्य नियमांच्या मंजुरीनंतर देशातील प्रथम विभाग फुटबॉल लीग प्रेक्षकांशिवाय मेच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करू करता येऊ शकेल, असे पोर्तुगाल सरकारने 30 एप्रिल रोजी सांगितले होते.
क्रीडा आणि आरोग्य अधिकारी अद्याप या नियमांवर काम करत आहेत आणि म्हणूनच या स्पर्धांच्या नव्या तारखांची घोषणा झालेली नाही. या लीगमध्ये 10 फेऱ्यांचे सामने खेळले जाणार आहेत. अव्वल विभागातील संघांनी मात्र प्रशिक्षण सुरू केले होते.