पोर्टो- युएफा नेशन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रीकच्या जोरावर पोर्तुगालने ३-१ गोलफरकाने स्वित्झर्लंडचा पराभव केला.
रोनाल्डोची धमाकेदार हॅट्ट्रीक... स्वित्झर्लंडला नमवत पोर्तुगालचा फायनलमध्ये प्रवेश - पोर्टो
ख्रिस्तियानो रोनाल्डोने ८८ व्या आणि ९० व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्चित केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोर्तुगालने आक्रमक खेळावर भर दिला. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर रोनाल्डोने शानदार गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. यानंतर, दोन्ही संघांनी या सत्रात अनेक चाली रचत गोल करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, कोणत्याही संघाला गोल करता आला नाही.
दुसऱ्या सत्रात स्वित्झर्लंडकडून ५७ व्या मिनिटाला रिकार्डो रॉड्रिगेजने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. परंतु, ख्रिस्तियानो रोनाल्डोने ८८ व्या आणि ९० व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्चित केला. यासह पोर्तुगालने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.