रिओ डि जानेरो -बलाढ्य अर्जेंटिनाला २-० ने हरवत ब्राझीलने कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. तर दुसरीकडे, पेरूने चिलीवर ३-० ने धक्कादायक मात करत अंतिम फेरी गाठली.
कोपा अमेरिकेच्या विजेतेपदासाठी ब्राझील आणि पेरू भिडणार
या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ब्राझील आणि पेरू माराकाना येथे भिडणार आहेत.
या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ब्राझील आणि पेरू माराकाना येथे भिडणार आहेत. हा सामना दुपारी १ वाजता सुरु होणार असून अंतिम सामन्यासाठी पेरुपेक्षा ब्राझीलचा संघ मजबूत मानला जात आहे. ब्राझीलने गटसामन्यात पेरूला ५-० ने मात दिली होती.
ब्राझीलने आठ वेळा विजेतेपद तर अकरा वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. पेरूचा संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. ब्राझीलचा मिडफील्डर सासीमिरो याने म्हटले आहे, 'पेरूचा संघ चिली आणि उरुग्वे यांना हरवत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही'.