महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धावपटू उसेन बोल्ट म्हणतो, पोग्बा हा 'वर्ल्ड क्लास' खेळाडू - धावपटू उसेन बोल्टच्या मते पोग्बा 'वर्ल्ड क्लास' खेळाडू

बोल्ट म्हणाला, 'मार्कस रॅशफोर्ड हा खेळाडूसुद्धा पोग्बाच्या वाटेवर आहे. मी मँचेस्टर युनायटेडचा चाहता आहे. मला वाटते की आमचा संघ हा अतिशय मेहनत घेऊन यश मिळवेल. यंदाच्या हंगामात सुरुवात निराशाजनक झाली. पण आम्हाला आशा आहे की पुढच्या चॅम्पियन्स लीगमध्ये आम्ही चांगले प्रदर्शन करू. '

धावपटू उसेन बोल्ट म्हणतो, पोग्बा हा 'वर्ल्ड क्लास' खेळाडू

By

Published : Sep 22, 2019, 11:46 AM IST

नवी दिल्ली -जमैकाचा स्टार धावपटू सध्या एका फुटबॉलपटूच्या प्रेमात आहे. हा फुटबॉलपटू दुसरा तिसरा कोणी नसून मँचेस्टर युनायटेडचा मिडफिल्डर पॉल पोग्बा हा आहे. बोल्टने पोग्बाला'वर्ल्ड क्लास' खेळाडू म्हणून संबोधले आहे.

हेही वाचा -जपान ओपन : नाओमी ओसाकाची फायनलमध्ये धडक

बोल्ट म्हणाला, 'मार्कस रॅशफोर्ड हा खेळाडूसुद्धा पोग्बाच्या वाटेवर आहे. मी मँचेस्टर युनायटेडचा चाहता आहे. मला वाटते की आमचा संघ हा अतिशय मेहनत घेऊन यश मिळवेल. यंदाच्या हंगामात सुरुवात निराशाजनक झाली. पण आम्हाला आशा आहे की पुढच्या चॅम्पियन्स लीगमध्ये आम्ही चांगले प्रदर्शन करू. '

पॉल पोग्बा

यंदाच्या फिफा सर्वोत्कृष्ठ खेळाडूंमध्ये युवेंटसचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, बार्सिलोनाचा मेस्सी, आणि लिवरपुलचा वर्जिल वॅन जिक यांना नामांकन मिळाले आहे. बोल्ट या पुरस्कारांसंबंधी म्हणाला, 'हे सर्व खेळाडू उत्तम आहेत. पण मी युनायटेडचा चाहता असल्यामुळे मी रोनाल्डोला मत देईन.'

४x१०० मीटर रिले धावप्रकारात कोणत्या खेळाडूला निवडशील असा प्रश्न बोल्टला विचारल्यावर त्याने कायलन एमबापे आणि गॅरेथ बॅले या दोन खेळाडूंची नावे घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details