पॅरिस -फ्रान्सचा फुटबॉल क्लब आणि फ्रेंच लीग-1 चा विजेता क्लब पॅरिस सेंट जर्मेनने (पीएसजी) या मोसमातील दुसरी ट्रॉफी आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात पीएसजीने सेंट एटिनला 1-0 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. मात्र, या सामन्यात विजेत्या संघाचा स्टार खेळाडू, किलियन एम्बाप्पे जखमी झाला. एका वृत्तानुसार, सामन्यादरम्यान फ्रान्सचा वर्ल्डकप विजेत्या संघाचा फुटबॉलपटू एम्बाप्पे आणि एटिनचा कर्णधार लोईक पेरिन यांच्यात धडक झाली. या धडकेमुळे एम्बाप्पेच्या पायाला दुखापत झाली.
पॅरिस सेंट जर्मेनने जिंकला फ्रेंच कप - psg win french cup title 2020
पेरिलच्या चुकीच्या, दोन्ही संघातील खेळाडू आपसात भिडले. त्यानंतर एम्बाप्पेला मैदान सोडून बाहेर जावे लागले. एटिनेमध्ये 17 वर्षे घालवल्यानंतर पेरिल आपला शेवटचा सामना खेळत होता.
पेरिनच्या चुकीमुळे दोन्ही संघातील खेळाडू आपसात भिडले. त्यानंतर एम्बाप्पेला मैदान सोडून बाहेर जावे लागले. एटिनेमध्ये 17 वर्षे घालवल्यानंतर पेरिन आपला शेवटचा सामना खेळत होता.
पॅरिस सेंट जर्मेनकडून 14 व्या मिनिटाला ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने सामन्यात एकमेव गोल केला. प्रेक्षकांच्या उपस्थितीत युरोपमध्ये खेळलेला हा पहिला स्पर्धात्मक सामना होता. 80 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये पाच हजार लोक उपस्थित होते. सामना सुरू होण्यापूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनदेखील स्टेडियमवर हजर होते.