नवी दिल्ली -इंडियन सुपर लीगची (आयएसएल) फ्रेंचायझी ओडिशा एफसीने मंगळवारी भारतीय मिडफिल्डर थोइबा सिंह मोइरंगथेमबरोबर करार केला. या करारानंतर थोइबा आता तीन वर्ष ओडिशा एफसीकडून खेळेल. "मी ओडिशाकडून खेळण्यास आणि आयएसएलमध्ये स्थान मिळवण्यात उत्सुक आहे. मला खात्री आहे की ओडिशा एफसीमध्ये दररोज काहीतरी शिकण्याने माझा खेळ आणखी सुधारेल", असे 17 वर्षीय थोइबाने म्हटले.
थोइबा सिंहचा ओडिशा एफसीसोबत करार - thoiba singh in isl news
मणिपूरमध्ये जन्मलेल्या थोइबाने वयोगटातील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तो गेल्या दोन हंगामात आय-लीग टीम मिनेर्वा पंजाब एफसीबरोबर खेळला. गेल्या वर्षी एएफसी चषकात गोल नोंदवणारा तो सर्वात तरुण खेळाडूदेखील ठरला.
थोइबा सिंहचा ओडिशा एफसीसोबत करार
मणिपूरमध्ये जन्मलेल्या थोइबाने वयोगटातील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तो गेल्या दोन हंगामात आय-लीग टीम मिनेर्वा पंजाब एफसीबरोबर खेळला. गेल्या वर्षी एएफसी चषकात गोल नोंदवणारा तो सर्वात तरुण खेळाडूदेखील ठरला.
ओडिशा एफसी क्लबचे अध्यक्ष रोहन शर्मा म्हणाले, "थॉइबा हा एक अतिशय रोमांचक आणि अष्टपैलू खेळाडू आहे. यावर्षी आम्ही त्याला संघात आणले याचा मला खरोखर आनंद झाला आहे."