महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पोर्तुगालमध्ये फुटबॉल लीग पुन्हा सुरू करण्यासाठी 9 स्टेडियमना मान्यता - football stadiums sanctioned portugal news

व्हिटोरिया गॉमेरेस, टोंडेला, पोत्रे, स्पॉर्टिग, बेनफीका, मेरीटिमो, ब्रागा आणि पोर्टिमेंन्स येथील मैदानांना राष्ट्रीय संघासाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही मैदाने काही सामन्यांसाठी वापरली जातील.

9 stadiums sanctioned to resume football league in portugal
पोर्तुगालमध्ये फुटबॉल लीग पुन्हा सुरू करण्यासाठी 9 स्टेडियमना मान्यता

By

Published : May 22, 2020, 9:14 AM IST

लिस्बन -पोर्तुगालमध्ये फुटबॉल लीग पुन्हा सुरू करण्यासाठी 9 स्टेडियमना मान्यता देण्यात आली आहे. कोरोनानंतर फुटबॉलला परत 'ट्रॅक'वर घेऊन येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित सहा स्टेडियम सरकारकडून मंजूर होणे बाकी असून या स्टेडियमची दुसऱ्यांदा तपासणी केली जाईल, असे पोर्तुगालची अव्वल लीग प्रीमियर लीगाने म्हटले आहे.

व्हिटोरिया गॉमेरेस, टोंडेला, पोत्रे, स्पॉर्टिग, बेनफीका, मेरीटिमो, ब्रागा आणि पोर्टिमेंन्स येथील मैदानांना राष्ट्रीय संघासाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही मैदाने काही सामन्यांसाठी वापरली जातील.

4 जूनपासून लीगा पोर्तुगालचे सामने खेळले जातील. मागील महिन्यात पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी जाहीर केले, की हे सामने पुन्हा 30 मे पासून प्रेक्षकांशिवाय खेळले जातील. कोरोना विषाणूमुळे 12 मार्चपासून ही लीग निलंबित करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details