महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेमारची ५२ वर्षीय आई २२ वर्षीय मुलाच्या प्रेमात, बॉयफ्रेंड आहे मुलापेक्षा ६ वर्षांनी लहान - स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरची ५२ वर्षीय आई नादीन गोनकाल्विस ही एका २२ वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आहे.

Neymar mum Nadine Goncalves, 52, dating 22-year-old  dreamy boy  gamer who is six years YOUNGER than PSG star son
नेमारची ५२ वर्षीय आई २२ वर्षीय मुलाच्या प्रेमात, बॉयफ्रेंड आहे मुलापेक्षा ६ वर्षांनी लहान

By

Published : Apr 13, 2020, 12:04 PM IST

मुंबई- ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरची ५२ वर्षीय आई नादीन गोनकाल्विस ही एका २२ वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नादीन २२ वर्षांच्या एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने ही गोष्ट सार्वजनिकरित्या मान्य केली आहे.

नादीनने त्याच्या इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ती आणि बॉयफ्रेंड टियागो रामोस एका बागेमध्ये उभे असलेले दिसत आहेत. फोटो शेअर करताना नादीनने लिहिले आहे की, 'हे व्यक्त केले जाऊ शकत नाही. तुम्ही हे जगता' यानंतर नादीनने एक हार्ट वाला इमोजी देत पोस्ट शेअर केली आहे.

नादिनचा बॉयफ्रेंड टियागो एक कम्प्युटर गेमर आहे. नेमारपेक्षा तो ६ वर्षांनी लहान आहे. महत्वाचे म्हणजे, तो नेमारचा खूप मोठा फॅन आहे. याचा खुलासा खुद्द टियागोने केला आहे.

त्याने नेमारला याआधी एक मॅजेस केला आहे. त्यात त्याने, नेमार तू खूप भारी आहेस. मला माहित नाही की, तुझ्यासारख्या माणसाचा फॅन असण्याची भावना कशी समजून घ्यावी. मी तुला खेळताना पाहतो तेव्हा मला प्रेरणा मिळते. मला एक दिवस तुला नक्की भेटणार, कारण मी एक ड्रीम बॉय आहे आणि मी माझे लक्ष्य कधीच सोडत नाही, असे लिहले आहे.

दरम्यान, नेमारला त्याच्या आईच्या नात्याबद्दल माहिती आहे. त्याने सोशल मीडियावरून आईला या नव्या नात्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. एतकेच नाही तर नेमारचे वडिल वॅगनर यांनाही याची माहिती त्यांनीही नेमारप्रमाणे नादीनला शुभेच्छा दिल्या आहेत. नेमारच्या आईने पती आणि नेमारचे वडिल वॅगनर रिबेरियोशी यांच्यासोबत २०१६ मध्ये घटस्फोट घेतला आहे.

हेही वाचा -सुनील छेत्री म्हणतो 'या' खेळात मी रोनाल्डो-मेस्सीला पाणी पाजू शकतो!

हेही वाचा -विराटनंतर, रोनाल्डोनेही कापले केस... व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details