रिओ डी जेनेरो- कोरोनामुळे जगभरात आज (शनिवार) सकाळपर्यंत ५९ हजार १४१ लोकांचा बळी गेला आहे. तर जवळपास ११ लाख लोकांना याची लागण झाली आहे. अशा संकटाच्या काळात क्रीडा विश्वातील खेळाडू मदतीसाठी पुढे आले आहेत. ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने कोरोनाग्रस्तासाठी ७ करोड रुपयाची मदत जाहीर केली आहे. त्याने ही रक्कम युनिसेफला दिली असून यातून ब्राझिलमधील पीडितांना मदत केली जाणार आहे.
नेमारने कोरोनाग्रस्तासाठी केली ७ करोडची मदत.. नेमार व्यतिरिक्त ख्रिस्तियानो रोनान्डो, लिओनाल मेस्सी, रॉजर फेडरर, राफेल नदाल यांनी करोडो रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी ४.६ करोड रुपये जमवले आहेत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही (एआयएफएफ) कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागाननेही २० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव आदींनी मदत दिली आहे.
हेही वाचा -कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी ‘मोहन बागान’कडून 20 लाख रुपये जाहीर
हेही वाचा -कोरोना : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून २५ लाखांची मदत