नवी दिल्ली -नेदरलँडचा माजी फुटबॉलपटू केल्विन मेनार्ड याची हत्या करण्यात आली आहे. अॅम्स्टरडॅम येथे दोन बाईकस्वारांनी ३२ वर्षीय मेनार्डला भर रस्त्यात गोळ्या घातल्या. मेनार्ड आपल्या गाडीने प्रवास करत होता तेव्हा ही घटना घडली.
हेही वाचा -विराटने खेळली 'अशी' खेळी की, आफ्रिकेला मालिका जिंकणे कदापीही शक्य नाही
नेदरलँडचा प्रसिध्द फुटबॉलपटू आणि संघातील एक उत्तम बचावपटू म्हणून मेनार्डची ओळख होती. नेदरलँड संघाबरोबरच बर्टन एल्बियन एफसी संघाचाही तो हिस्सा होता. पोलिस त्याच्या मारेकऱ्यांचा तपास करत असून त्याच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मेनार्डची जेव्हा हत्या झाली तेव्हा एका वकीलाचाही असाच खून करण्यात आला होता. या खूनाचा संबंध अंडरवर्ल्डशी जोडण्यात येत आहे. मेनार्डचा क्लब एल्फेंस बॉय्जने त्याच्यासाठी आणि परिवारासाठी शोक व्यक्त केला आहे.