पॅरिस -अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडलं आहे. पॅरिस सेंट जर्मेन क्लबसोबत त्यानं नवा करार केला आहे. या करारनंतर मेस्सीने चॅम्पियन्स लीग जिंकण्याचे स्वप्न असल्याचे सांगितलं.
34 वर्षीय मेस्सीसोबत असताना बार्सिलोना क्लबने चार वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते. त्याने बार्सिलोनासोबत अखेरचे विजेतेपद 2015 मध्ये पटकावले होते.
पीएसजीला अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. ते 2020 मध्ये अंतिम सामन्यात पोहोचले होते. परंतु त्यांचा बायर्न मूनिचने पराभव केला होता. तर त्या पाठीमागील हंगामात ते उपांत्य फेरीत पराभूत झाले होते.
मेस्सी पत्रकार परिषदेत म्हणाला, पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग जिंकणे माझे लक्ष्य आणि स्वप्न आहे. हे करण्यासाठी आमच्याकडे तगडा संघ आहे. दरम्यान, मेस्सीने पीएसजीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. तो करार मेस्सीला 3 वर्षे वाढवता येणार आहे.