कोलकाता - भारतातील आघाडीच्या फुटबॉल क्लबपैकी एक असलेला मोहन बागान क्लब कोरोनामुळे 29 जुलै रोजी होणाऱ्या मोहन बागान दिनानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही. हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित केला जाईल.
मोहन क्लब आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) क्लब एटीकेमध्ये विलीन झाला आहे. क्लबने त्यांचे वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. मात्र, या पुरस्कारासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.
दिग्गज हॉकीपटू गुरबक्ष सिंह आणि बंगालचे माजी क्रिकेटपटू पलाश नंदी यांना मोहन बागान रत्न पुरस्काराने गौरवण्यात येईल. अशोक कुमार (हॉकी), प्रणव गांगुली (फुटबॉल) आणि मनोरंजन पोरेल (अॅथलेटिक्स) यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
60 च्या दशकाच्या उत्तरार्धात अशोक कुमार मोहन बागानशी संबंधित होते आणि भारतीय हॉकी संघात निवड होण्यापूर्वी बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या हंगामात संघासाठी आय-लीग विजेतेपद मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जोसेबा बेइटियाला 'सर्वोत्तम फुटबॉलपटू' (वरिष्ठ) पुरस्कार देण्यात येईल.