बार्सिलोना -लिव्हरपूल संघासाठी फॉरवर्ड पोझिशनला खेळणारे आघाडीचे फुटबॉलपटू मोहम्मद सलाह आणि रॉबेटरे फिर्मिनो हे मंगळवारी चॅम्पियन्स लीगमध्ये होणाऱ्या बार्सिलोनाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लेग सामन्यात खेळू शकणार नाहीत. दोन्ही खेळडू दुखापतग्रस्त असल्याने उद्या होणाऱ्या सामन्यात मैदानावर येऊ शकणार नाहीयत.
लिव्हरपूलला मोठा धक्का, बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्यातून मोहम्मद सलाह आणि रॉबेटरे फिर्मिनो बाहेर
स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी लिव्हरपूलला बार्सिलोनावर मोठ्या फरकाने विजय आवश्यक
सलाह आणि फिर्मिनो यांच्या दुखापतीवर बोलताना लिव्हरपूलचे प्रक्षिशक जुर्गन क्लॉप म्हणाले, की 'फुटबॉल जगातातील हे दोन मोठे स्ट्रायकर उद्याच्या सामन्यासाठी संघात उपलब्ध नसतील. या सामन्यात आम्हाला कमीतकमी चार गोल करण्याची गरज आहे. हे सोपे नाहीय, परंतु आम्ही सामन्यातील ९० मिनिटे चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरू.'
चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने लिव्हरपूलवर ३-० असा उडवत एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी लिव्हरपूलला बार्सिलोनावर मोठ्या फरकाने विजयाची नोंद करावी लागणार आहे.