नवी दिल्ली - फुटबॉलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघात परतला आहे. युरोपियन चॅम्पियन लीगमध्ये आज होणाऱ्या बोरशिया डार्टमंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकतो.
हेही वाचा -सानिया मिर्झाची बहीण करू शकते 'या' क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न..
पोटरीच्या दुखापतीमुळे मेस्सी चॅम्पियन लीगच्या प्री-सीजनमध्ये खेळू शकला नव्हता. मात्र, सोमवारी संघाचे प्रशिक्षक अर्नेस्टो वालवर्दे यांनी जर्मनीला पोहोचणाऱ्या गटात त्याचे नाव सामील करून घेतले आहे. ला लीगाच्या पहिल्या तीन सामन्यात मेस्सी खेळू शकला नव्हता. त्यानंतर तो संघासोबत सराव करताना दिसला.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटचा विजयारंभ, सलामीलाच ऑलिम्पिक विजेतीवर केली मात
प्रशिक्षक अर्नेस्टो वालवर्दे म्हणाले, 'मेस्सी खेळणार की नाही याविषयी आम्ही उद्या निर्णय घेऊ. काही दिवसांपूर्वी आम्हाला माहीत नव्हते की नक्की काय होईल. पण, त्याने सरावात भाग घेतला आहे.' १६ वर्षाचा खेळाडू अंसू फाटीला संघात सामील करून घेतले आहे. त्याने तीन सामन्यात दोन गोल केले आहेत.