महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मेस्सीकडून इंटर मिलानच्या वृत्ताचे खंडन - latest news about messi news

मेस्सीने इन्स्टाग्राममार्फत सांगितले, की काही आठवड्यांपूर्वी नेव्हल ओल्ड बॉईज बद्दल जे सांगितले जात होते, तेदेखील चुकीचे आहे. नशीब हे कोणाला खरे वाटले नाही. ब्राझीलच्या रोनाल्डिन्होला जामिनास मदत करणाऱ्या वृत्ताचेही मेस्सीने खंडण केले. रोनाल्डिन्होला नुकतेच पराग्वे कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले आहे.

Messi refuses to go to Inter milan
मेस्सीकडून इंटर मिलानच्या वृत्ताचे खंडन

By

Published : Apr 10, 2020, 6:41 PM IST

ब्युनोस आयर्स - बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने इटलीचा क्लब इंटर मिलानच्या वृत्ताचे खंडन केले आहे. शिवाय, क्लब नेवेलमध्ये जाण्याच्या वृत्तासही मेस्सीने नकार दिला आहे.

मेस्सीने इन्स्टाग्राममार्फत सांगितले, की काही आठवड्यांपूर्वी नेव्हल ओल्ड बॉईज बद्दल जे सांगितले जात होते तेदेखील चुकीचे आहे. नशीब हे कोणाला खरे वाटले नाही. ब्राझीलच्या रोनाल्डिन्होला जामिनास मदत करणाऱ्या वृत्ताचेही मेस्सीने खंडण केले. रोनाल्डिन्होला नुकतेच पराग्वे कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले आहे.

बनावट पासपोर्टमुळे अटक करण्यात आलेला ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ रोबटेरे एसीस यांना तुरूंगातून सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायाधीशांनी या दोघांची नजरकैदेत ठेवण्याची विनंती मान्य केली आहे. ३९ वर्षीय रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ बनावट पासपोर्टसह पॅराग्वेमध्ये दाखल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details