लंडन- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मँचेस्टर सिटीला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यास दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) ही कारवाई केली असून या कारवाईमुळे आता मँचेस्टर सिटीला युरोपमधील कोणत्याही स्पर्धामध्ये पुढील दोन वर्षे खेळता येणार नाही. दरम्यान मँचेस्टर सिटीने या बंदीविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोपियन फुटबॉल महासंघाने शुक्रवारी रात्री दोन वर्षांच्या बंदीसह तीन कोटी युरोचा दंडही मँचेस्टर सिटीला केला आहे. यावर मँचेस्टर सिटीने क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
मँचेस्टर सिटीवर काय आहे आरोप -
मँचेस्टर सिटीने क्लब परवाना तसेच आर्थिक खेळभावना नियमांचे उल्लंघन केले. तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांनाही सहकार्य केले नाही, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.