महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CARABAO CUP: रोमांचक सामन्यात मॅनचेस्टर सिटीचा चेल्सीवर विजय - वेम्ब्ले स्टेडियम

अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात सिटीने पेनल्टी किकवर हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकत विजेतेपद पटकावले.

सिटी १

By

Published : Feb 25, 2019, 11:49 AM IST

लंडन- वेम्ब्ले स्टेडियम येथे झालेल्या कॅराबॉउ कपच्या अंतिम सामन्यात मॅन्चेस्टर सिटीसमोर चेल्सीचे आवाहन होते. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात सिटीने पेनल्टी किकवर हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकत विजेतेपद पटकावले.

दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. सिटीने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत चेल्सीवर दबाव वाढवला होता. सिटीला गोल करण्याची चांगली संधी होती. परंतु, चेल्सीचा गोलकिपर केपा अरिझाब्लागाने चांगला बचाव करत सिटीचा गोल होवू दिला नाही. निर्धारित ९० मिनिटात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. यानंतर वाढवून देण्यात आलेल्या अतिरिक्त ३० मिनिटातही गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले.

निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी किकवर ठरवण्यात आला. मॅनचेस्टर सिटीने ५ पेनल्टीपैकी ४ पेनल्टीवर गोल केले. तर, चेल्सीला ५ पेनल्टीपैकी ३ पेनल्टीवरच गोल करता आले. चेल्सीवर विजयासह चेल्सीने सलग दुसऱयावर्षी चषकावर आपले नाव कोरले.

ABOUT THE AUTHOR

...view details