लिव्हरपूल -इंग्लंडचा फुटबॉल क्लब लिव्हरपूलचा खेळाडू सादिओ मानेला कोरोनाची लागण झाली आहे. क्लबने याची माहिती दिली. सोमवारी लिव्हरपूलने आर्सेनालशी सामना खेळला. या सामन्यात लिव्हरपूलने ३-१ अशी बाजी मारली. या सामन्यात मानेने एक गोल केला आहे.
लिव्हरपूलच्या अजून एका खेळाडूला कोरोनाची लागण - Liverpool player corona news
लिव्हरपूलचा स्पॅनिश फुटबॉलपटू थियागो अलकंटाराला कोरोना झाला होता.

मानेला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्याने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांनी स्वत: ला वेगळे केले आहे, असे लिव्हरपूलने सांगितले. मानेअगोदर क्लबचा स्पॅनिश फुटबॉलपटू थियागो अलकंटारा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. अलकंटारानेही स्वत: ला वेगळे केले आहे.
२९ वर्षीय अलकंटारा सोमवारी झालेल्या आर्सेनलविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याला सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्याची तब्येत चांगली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अलकंटाराने बायर्न म्युनिकला रामराम ठोकले आहे. आठ दिवसांपूर्वी चेल्सीविरूद्ध सामन्यात त्याने लिव्हरपूलकडून पदार्पण केले.