नवी दिल्ली - इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) गतविजेत्या लिव्हरपूलचा स्पॅनिश फुटबॉलपटू थियागो अलकंटारा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. क्लबने ही माहिती दिली. ''लिव्हरपूलचा मिडफिल्डर थियागो अलकंटाराला कोरोनाची लागण झाली आहे. आवश्यक मार्गदर्शक सूचनांनुसार आता त्याने स्वत: ला वेगळे केले आहे'', असे क्लबने सांगितले.
लिव्हरपूलच्या फुटबॉलपटूला कोरोनाची लागण
लिव्हरपूलचा स्पॅनिश मिडफिल्डर थियागो अलकंटाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्याची तब्येत चांगली आहे, असे क्लबने सांगितले.
२९ वर्षीय अलकंटारा सोमवारी झालेल्या आर्सेनलविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याला सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्याची तब्येत चांगली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अलकंटाराने बायर्न म्युनिकला रामराम ठोकले आहे. आठ दिवसांपूर्वी चेल्सीविरूद्ध सामन्यात त्याने लिव्हरपूलकडून पदार्पण केले.
तत्पूर्वी, इटालियन फुटबॉल संघ एसी मिलानचा स्टार फुटबॉलर झ्लाटन इब्राहिमोविचला कोरोनाची लागण झाली आहे. इब्राहिमोविचने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ''आतापर्यंत कोणती लक्षणे नाहीत. कोरोनामध्ये मला आव्हान देण्याचे धैर्य होते. वाईट कल्पना'', असे इब्राहिमोविचने ट्विटमध्ये म्हटले आहे.