लिव्हरपूल -चेल्सीने मँचेस्टर सिटीला 2-1 ने हरवल्यानंतर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या (ईपीएल) किताबावर आपले नाव कोरले. लिव्हरपूलने या विजेतेपदासह 30 वर्षांचा दुष्काळ संपवला. गुरुवारी झालेल्या मँचेस्टर सिटीच्या पराभवामुळे लिव्हरपूलला 23 गुणांची आघाडी मिळाली.
30 वर्षांचा दुष्काळ संपवत लिव्हरपूलने पटकावले विजेतेपद - epl title after 30 years liverpool news
लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गन क्लोप यांनी लिव्हरपूलचे माजी व्यवस्थापक सर कॅनी डालग्लिश यांची आठवण काढली. डालग्लिश यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने याआधी विजेतेपद पटकावले होते. 2012-13 मध्ये स्टीव्ह गेरार्डच्या नेतृत्वाखाली लिव्हरपूलचा संघ विजेतेपदाच्या जवळ पोहोचला होता.
कोरोनाच्या उद्रेकानंतर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात एनफिल्ड क्लबने क्रस्टल पॅलेसला 4-0 असे हरवले. लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गन क्लोप यांनी लिव्हरपूलचे माजी व्यवस्थापक सर कॅनी डालग्लिश यांची आठवण काढली. डालग्लिश यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने याआधी विजेतेपद पटकावले होते. 2012-13 मध्ये स्टीव्ह गेरार्डच्या नेतृत्वाखाली लिव्हरपूलचा संघ विजेतेपदाच्या जवळ पोहोचला होता.
"हे अविश्वसनीय आहे. कॅनीने किती समर्थन केले हे मला माहित आहे. त्यांनी 30 वर्षे वाट पाहिली. स्टीव्ह गेरार्डसाठी हे विजेतेपद महत्त्वाचे आहे", असे क्लोप यांनी म्हटले. क्लोप यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने यूईएफए चॅम्पियन्स ली-2019 आणि आणि फिफा क्लब विश्वकरंडक स्पर्धा जिंकली आहे.