लंडन -फुटबॉल क्लब लिव्हरपूलचा कर्णधार जॉर्डन हेंडरसन दुखापतीमुळे १० आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. २० फेब्रुवारी रोजी एव्हर्टनविरुद्धच्या सामन्यादरम्यान ३० वर्षीय हेंडरसनला पूर्वार्धात दुखापत झाली होती.
हेंडरसनची शस्त्रक्रिया झाली आहे आणि इंग्लंडकडून तो तीन विश्वचषक पात्रता सामने खेळू शकणार नाही. लिव्हरपूलने क्लबच्या संकेतस्थळावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, हेंडरसनच्या परतीसाठी काही वेळापत्रक नाही. तो काही दिवस मैदानाबाहेर असेल.