माद्रिद- लिव्हरपूर आणि टोटेनहॅम हॉटस्पर यांच्यात झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रंगला होता. लिव्हरपूलने धडाकेबाज कामगिरी करताना टोटेनहॅमला हॉटस्परला २-० गोलफरकाने हरवत चॅम्पियन्स लीगचा किताब पटकावला. २००५ सालानंतर लिव्हरपूलने तब्बल १४ वर्षानंतर चषकावर नाव कोरले आहे.
युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूल आणि टोटेनहॅम हॉटस्पर हे २ इंग्लीश प्रीमिअर लीगचे संघ एकमेकांसमोर होते. लिव्हरपूलने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना दुसऱ्याच मिनिटाला झाला. टोटेनहॅमच्या खेळाडून पेनल्टी भागात हाताने चेंडू अडवल्याने लिव्हरपूलला पेनल्टी किक मिळाली. याचा फायदा घेताना लिव्हरपूलचा आघाडीचा खेळाडू मोहम्मद सलाहने कोणतीही चूक न करता गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात गोल करणारा मोहम्मद सलाह इजिप्तचा पहिला खेळाडू ठरला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ झाला. परंतु, गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले.