म्युनिक- चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या फेरीत यजमान बायर्न म्युनिकसमोर लिव्हरपूलचे आव्हान होते. लिव्हरपूलने सादियो मानेच्या २ गोलच्या बळावर बायर्न म्युनिकला ३-१ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
चॅम्पियन्स लीग : अंतिम-१६ च्या फेरीत यजमान बायर्न मुनिकला पराभवाचा धक्का... - चॅम्पियन्स लीग
लिव्हरपूलने सादियो मानेच्या २ गोलच्या बळावर बायर्न म्युनिकला ३-१ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
![चॅम्पियन्स लीग : अंतिम-१६ च्या फेरीत यजमान बायर्न मुनिकला पराभवाचा धक्का...](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2689003-374-7a920289-8a29-4e9e-bbfc-75e8a1bbed0b.jpg)
लिव्हरपूलकडून सादियो मानेने २६ व्या मिनिटाला गोल केला. लिव्हरपूलच्या जोएल मॅटिपकडून झालेल्या स्वयंगोलाने बायर्न म्युनिकने ३९ व्या मिनिटाला १-१ अशी बरोबरी साधली. पहिले सत्र १-१ बरोबरीत सुटल्यानंतर लिव्हरपूलने दुसऱया सत्रात संधी मिळताच बायर्नवर आक्रमक चाली रचल्या. लिव्हरपूलकडून व्हर्जिल व्हॅन डिजिकने ६९ व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-१ अशी केली. यानंतर, सादियो मानेने ८४ व्या मिनिटाला मोहम्मद सलाहच्या पासवर गोल करत लिव्हरपूलचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
सामन्यात बायर्नने पुनरागमनाचे अनेक प्रयत्न केले. सामन्यात जवळपास ५८ टक्के चेंडूचा ताबा बायर्नच्या संघाकडे होता. परंतु, संघाला गोल करण्यात अपयश आले.