महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चॅम्पियन्स लीगमध्ये मोठा उलटफेर, लिव्हरपूलकडून मेस्सीच्या बार्सिलोनाला पराभवाचा धक्का - final

विशेष म्हणजे लिव्हरपुलचे आघाडीचे फुटबॉलपटू मोहम्मद सलाह आणि रॉबेटरे फिर्मिनो स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत लिव्हरपुलने हा विजय मिळवला

लिव्हरपूलची अंतिम फेरीत धडक

By

Published : May 8, 2019, 5:54 PM IST

इंग्लंड - चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये झालेल्या सामन्यात लिव्हरपूलने बार्सिलोनाचा ४-० असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय साजरा केला. या पराभवासह मेस्सीच्या बार्सिलोनालाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर लिव्हरपूलने मोठ्या थाटात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

लिव्हरपूलची अंतिम फेरीत धडक


बार्सिलोनाने पहिल्या लेगमध्ये लिव्हरपूलला ३-० ने पराभूत केले होते. त्याची परतफेड लिव्हरपूलने दुसऱ्या लेगमध्ये ४-० ने दणदणित विजय साजरा करत केली. लिव्हरपूलसाठी डिवोक ओरिगीने आणि जॉर्जिनिओ प्रत्येकी २ गोल दागत संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.


लिव्हरपुलने सलग दुसऱ्या वर्षी चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत लिव्हरपूलचा सामना अजॅक्स आणि टॉटेनहॅम यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details