महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मेस्सीचं धूमशान...सहाव्यांदा पटकावला  ‘बलोन डी ओर’ पुरस्कार

रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे. तर, मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ मध्ये आणि यंदाचा पुरस्कार पटकावला आहे. लिव्हरपूलच्या व्हर्जिनला युईएफएचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. यावर्षी मेस्सीने फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारही जिंकला आहे.

lionel messi wins ballon dor trophy for six times
मेस्सीचं धुमशान...सहाव्यांदा पटकावला  ‘बलोन डी ओर’ पुरस्कार

By

Published : Dec 3, 2019, 12:17 PM IST

Updated : Dec 3, 2019, 3:08 PM IST

नवी दिल्ली - फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने इतिहास रचला. पोर्तुगाल आणि जुव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँड्सच्या व्हर्जिन व्हॅन डिज्जाकला मागे पछाडत मेस्सीने सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’चा (Ballon d'Or) पुरस्कार जिंकला आहे. तर, अमेरिकेच्या मेगन रेपिनो हिने महिलांमधील हा पुरस्कार पटकावला.

हेही वाचा -अधिकृत घोषणा: क्रिकेटर मिताली राजचा येणार बायोपिक, तापसी पन्नू साकारणार भूमिका

रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे. तर, मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ मध्ये आणि यंदाचा पुरस्कार पटकावला आहे. लिव्हरपूलच्या व्हर्जिनला युईएफएचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. यावर्षी मेस्सीने फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारही जिंकला आहे.

यंदा, मेस्सीने अजून एका विक्रमाला गवसणी घातली. तो चॅम्पियन्स लीगमधील ३४ वेगवेगळ्या संघांविरुद्ध गोल नोंदवणारा जगातील पहिला खेळाडूही ठरला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने बोरुसिया डॉर्टमुंडविरुद्ध गोल करून हा पराक्रम केला होता.

यंदाच्या फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला आहे.

Last Updated : Dec 3, 2019, 3:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details