बार्सिलोना -चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये झालेल्या सामन्यात स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाने लिव्हरपूलवर ३-० असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय साजरा केला. या सामन्यात बार्सिलोनसाठी अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने २ तर लुइस सुआरेझने १ गोल करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
चॅम्पियन्स लीग: मेस्सीने बार्सिलोनासाठी दागला ६००वा गोल, लिव्हरपूलचा ३-० ने उडवला धुव्वा - Argentine
कर्णधार लियोनेल मेस्सीने ७५ आणि ८२ मिनिटाला २ गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
बार्सिलोना आणि लिव्हरपूल यांच्यातील उपांत्य फेरीतील दुसरा लेग सामना ७ मेला खेळला जाणार आहे. लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणाऱया बार्सिलोनासाठी लुइस सुआरेझने २६ व्या मिनिटाला पहिलसा गोल दागत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार मेस्सीने ७५ आणि ८२ मिनिटाला २ गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात लियोनेल मेस्सीने २ गोल करत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. या २ गोलसह मेस्सीने बार्सिलोनासाठी खेळताना ६०० गोल पूर्ण करण्याचा विक्रम आपले नावे केलाय.