महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वकप क्वालीफायरसाठी अर्जेंटिना संघात लिओनेल मेस्सीला स्थान - विश्व कप क्वालीफायर

लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसोबत करार केला आहे. तरी देखील त्याला आगामी विश्वकप क्वालीफायरसाठी अर्जेंटिना संघात संधी देण्यात आली आहे.

Lionel Messi named in Argentina squad for World Cup qualifiers
विश्वकप क्वालीफायरसाठी अर्जेंटिना संघात लिओनेल मेस्सीला स्थान

By

Published : Aug 24, 2021, 7:36 PM IST

ब्यूनस एअरस -लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसोबत करार केला आहे. तरी देखील त्याला आगामी विश्वकप क्वालीफायरसाठी अर्जेंटिना संघात संधी देण्यात आली आहे.

अर्जेंटिना संघाने आपल्या स्टार खेळाडूंला देशाचे कर्तव्य बजावण्यसाठी बोलावलं आहे. दरम्यान मेस्सीने 11 जुलै रोजी कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलचा पराभव करत अर्जेंटिनाला विजेतेपद मिळून दिले होते. यानंतर त्याने अर्जेंटिनासाठी अद्याप एकही सामना खेळला नाही.

दरम्यान, कोपा अमेरिका स्पर्धेचा विजेत्या अर्जेंटिना संघाचा विश्वकप क्वालीफायरमध्ये वेनेझुएला, ब्राझील आणि बोलिविया या संघाच्या गटात समावेश आहे. याचे सामने सप्टेंबर महिन्यात होणार आहेत.

विश्व कप क्वालीफायरसाठीअसाआहेअर्जेंटिनाचा संघ -

फ्रेंको अरमानी, एमिलियानो मार्टिनेज, जुआन मुसो, गेरोनिमो रूल, गोंजालो मोंटिएल, मार्कोस एक्यूना, नहुएल मोलिना, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, जुआन फोएथ, लुकास मार्टिनेज क्वार्टा, जर्मन पेजेला, लिसेंड्रो मार्टिनेज, निकोलस टॅगलियाफिको, रोड्रिगो डी पॉल, लिएंड्रो पेरेडेस, जियोवानी लो सेल्सो, एक्सेक्विएल पलासियोस, गुइडो रोड्रिगेज, निकोलस डोमिंगुएज, एमिलियानो ब्यूंडिया, एलेजांद्रो गोमेझ, लिओनेल मेस्सी, एंजेल डी मारिया, लुटारो मार्टिनेज, निकोलस गोंजालेज, एंजेल कोरिया, पाउलो डायबाला, जूलियन अल्वारेज आणि जोकिन कोरिया.

हेही वाचा -क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं शैली सिंहच्या कामगिरीचे कौतुक

हेही वाचा -डुरंड कप 2021 मध्ये 5 आयएसएल आणि 3 आय लीगमधील संघ खेळणार

ABOUT THE AUTHOR

...view details