नवी दिल्ली -स्पॅनिश फुटबॉल लीग कोपा डेल रे स्पर्धेमध्ये बार्सिलोनाने लेगनेसचा ५-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयासह संघातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने मोठा विक्रम नोंदवला आहे. बार्सिलोनाकडून मेस्सीने ५०० सामने जिंकले असून स्पॅनिश फुटबॉलच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा -'धर्म बदलण्यासाठी अनेकांचे प्रयत्न, हिंदू असल्याचा मला गर्व'
मेस्सीपूर्वी बार्सिलोनाचा माजी खेळाडू जावी हर्नांडीझने ४७६ तर, आणि अँड्रेस इनिएस्टाने ४५९ सामने जिंकले आहेत. लेगनेस विरूद्धच्या सामन्यात बार्सिलोनाकडून चौथ्या मिनिटाला अँटॉइन ग्रिझ्मनने गोल केला. तर, २७ व्या मिनिटाला क्लेमेंट लेंगेलने संघासाठी दुसरा गोल नोंदवला. पाचवा गोल ७७ व्या मिनिटाला आर्थर मेलोने केला.
मेस्सीने आत्तापर्यंत बार्सिलोनासाठी ७१० सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने ६२१ गोल नोंदवले आहेत. दिग्गज खेळाडू पेले ६४३ गोलसह प्रथम स्थानावर विराजमान आहेत.