महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फुटबॉलपटू मेस्सीची अर्जेंटिनातील रुग्णालयाला आर्थिक मदत - argentina hospital messi donation news

या रकमेतून आरोग्य कर्मचार्‍यांना सर्व संरक्षक वस्तू आणि पीपीई किट दान करण्यात आल्या आहेत. मेस्सीने फाउंडेशनला सांता फे आणि ब्युनोस आयर्स प्रांतातील रुग्णालयांसाठी आरोग्यविषयक उपकरणे खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

lionel messi donates 5 million 40 thousand dollars to hospital in argentina
फुटबॉलपटू मेस्सीची अर्जेंटिनातील रुग्णालयाला आर्थिक मदत

By

Published : May 12, 2020, 11:58 AM IST

Updated : May 13, 2020, 10:25 AM IST

नवी दिल्ली -बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आपल्या देशातील एका रुग्णालयाला 5 लाख युरोची आर्थिक मदत केली आहे. ब्युनोस आयर्सचा पाया असलेल्या कासा गार्हानने म्हटले, की मेस्सीने 5 लाख 40 हजार डॉलर्सची (सुमारे चार कोटी रुपये) मदत केली आहे.

या रकमेतून आरोग्य कर्मचार्‍यांना सर्व संरक्षक वस्तू आणि पीपीई किट दान करण्यात आल्या आहेत. मेस्सीने फाउंडेशनला सांता फे आणि ब्युनोस आयर्स प्रांतातील रुग्णालयांसाठी आरोग्यविषयक उपकरणे खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

"ही उपकरणे आणि इतर संरक्षक वस्तू लवकरच रुग्णालयांमध्ये पोहचवल्या जातील. कोरोनाशी लढत असलेल्या बर्‍याच लोकांना याचा फायदा होईल", असे कासा गार्हानचे कार्यकारी संचालक सिल्विया कसाब यांनी म्हटले आहे. यापूर्वी मेस्सीने बार्सिलोना येथील एका रुग्णालयाला 10 लाख युरोंची देणगी दिली होती.

Last Updated : May 13, 2020, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details