नवी दिल्ली - बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ला-लिगामध्ये सलग 12 मोसमात 20 पेक्षा जास्त गोल नोंदवणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. शनिवारी मालोर्काविरुद्धच्या सामन्यात त्याने गोल नोंदवून ही कामगिरी नोंदवली. 98 दिवसानंतर मैदानावर परतलेल्या मेस्सीचा हा पहिला गोल होता.
98 दिवसानंतर मैदानावर पाऊल ठेवलेल्या मेस्सीने नोंदवला विक्रम
तीन महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानावर परतलेल्या बार्सिलोना संघाने विजयारंभ केला. स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगाच्या सामन्यात बार्सिलोनाने मालोर्काला 4-0 असे पराभूत केले.
या सामन्यात मेस्सीने बार्सिलोनाकडून दोन गोल करण्यात सहाय्य केले. या मोसमात त्याने आतापर्यंत 14 गोल करण्यात सहाय्य केले आहे. सध्याच्या मोसमात सर्वाधिक गोल करणार्या खेळाडूंना सहाय्य करणारा तो अव्वल फुटबॉलपटू आहे. तीन महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानावर परतलेल्या बार्सिलोना संघाने विजयारंभ केला. स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगाच्या सामन्यात बार्सिलोनाने मालोर्काला 4-0 असे पराभूत केले.
उजव्या पायाला मेस्सीला दुखापत झाली होती. मात्र, मेस्सीने सामन्यात संपूर्ण योगदान दिले. बार्सिलोनाकडून एट्रो विडाल (दुसर्या मिनिटाला) आणि मार्टिन ब्रेथवेट (37 व्या) यांनी सामन्याच्या पूर्वार्धात गोल केला. मेस्सीने ब्रेथवेटला गोल करण्यास सहाय्य केले. गोल केल्यानंतर या खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. दुसऱ्या सत्रात जोर्डी अल्बा (79 व्या मिनिटाला) आणि मेस्सीने अतिरिक्त वेळेत गोल करत सामना खिशात घातला.