नवी दिल्ली -क्रोएशियाच्या इगोर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपला आनंद व्यक्त केला आहे. नवीन प्रशिक्षकांना असलेल्या दिर्घ अनुभवाचा फायदा आम्हाला होईल अशा भावना यावेळी खेळाडूंनी व्यक्त केल्या आहेत.
इगोर स्टिमॅक यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर भारतीय फुटबॉल खेळाडूंनी व्यक्त केला आनंद - football
भारतीय फुटबॉल संघाने स्टिमॅक यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला आहे
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने स्टिमॅक यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंततर एक ट्विट केले आहे. त्या तो म्हणाला की, 'मी भारतीय फुटबॉल संघाचे नवीन बॉस इगोर स्टिमॅक यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे स्वागत करतो. त्यांच्याकडे प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभव असून त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. भारतीय संघातील सर्व खेळाडू आपले १०० योगदान देतील. मी पूर्ण संघासोबत बोललो असून आम्ही आमच्या फिटनेसवर काम करण्यास सुरुवात केली आहे.'
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) स्टिमॅक यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून स्टिमाक यांच्या कामाला थांयलंड येथे होणाऱ्या किंग्ज कप आंतरराष्ट्रीय मालिकेपासून सुरुवात होईल.