महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 14, 2019, 3:30 PM IST

ETV Bharat / sports

अॅटलेटिको माद्रिद विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डोडी हट्ट्रीक चकीत करणारी - लियोनल मेस्सी

युव्हेंट्सने २-० अशी पिछाडी भरुन काढत अॅटलेटिकोचा ३-० असा पराभव केला होता. युव्हेंट्सच्या आणि रोनाल्डोच्या कामगिरीवर अनेक दिग्गज फुटबॉलपटूंनी स्तुतीसुमने उधळली. आता लियोनल मेस्सीनेही रोनाल्डोची प्रशंसा केली आहे.

मेस्सी २२

बार्सिलोना- अॅटलेटिको माद्रिद यांनी युव्हेंट्स यांच्यात अंतिम-१६ च्या दुसऱया फेरीत ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्ट्रीक केली होती. रोनाल्डोच्या हॅट्ट्रीकच्या बळावर युव्हेंट्सने २-० अशी पिछाडी भरुन काढत अॅटलेटिकोचा ३-० असा पराभव केला होता. युव्हेंट्सच्या आणि रोनाल्डोच्या कामगिरीवर अनेक दिग्गज फुटबॉलपटूंनी स्तुतीसुमने उधळली. आता लियोनल मेस्सीनेही रोनाल्डोची प्रशंसा केली आहे.

लियोनल मेस्सी म्हणाला, मला वाटले होते, की अॅटलेटिको माद्रिदचा संघ चांगला आहे. परंतु, रोनाल्डोने चांगली कामगिरी करताना आकर्षक हॅट्ट्रीक साधली. रोनाल्डोची कामगिरी चकीत करणारी होती. मेस्सीला उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनासमोर युव्हेंट्सचे आव्हान येवू शकते, असे विचारल्यावर मेस्सी म्हणाला, प्रत्येक संघ हा आव्हानात्मक आहे. उदाहरणार्थ एजाक्स संघ, हा संघ तरुण खेळाडूंनी भरलेला आहे. तो कोणालाही भीत नाहीत. तुम्ही कोणत्याही संघाविरुद्ध खेळला तरी तुम्हाला कठीण आव्हान मिळणार आहे. त्यामुळे आम्ही कठीण आव्हानासाठी तयार आहोत.

बार्सिलोनाने अंतिम-१६ च्या फेरीत लायनचा ५-१ अशा फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लायनविरुद्धच्या विजयाबद्दल बोलताना मेस्सी म्हणाला, आम्ही सामन्याला चांगल्याप्रकारे सुरुवात केली. २-० अशी आघाडी असताना लायनने गोल करत आघाडी २-१ अशी केली होती. त्यावेळी आमच्यासाठी आव्हान कठीण झाले होते. परंतु, संघाकडून तिसरा गोल झाल्यानंतर आमची चिंता दूर झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details